सरतेय जगी माणुसकी
माणूसही सरतो आहे
आत्मा तर गेला निघूनी
हा देहच उरतो आहे
तडफडूनीया भुकेने
का गरीब मरतो आहे?
अन् उगाच पैशासाठी
श्रीमंतच झुरतो आहे
का धर्म जगीचा सरूनी
अधर्मच उरतो आहे?
अन् देवाला शोधाया
तो उगाच फिरतो आहे
हा भेद जाती धर्मांचा
तो उगाच करतो आहे
जन्मूनी मानव जन्मी
तो दानव ठरतो आहे
स्पर्धेत अशा जीवघेण्या
माणूसच हरतो आहे
पापांचे घडे स्वतःच्या
तो स्वतःच भरतो आहे
✍️: संचिता गड्डमवार
©sanchita gaddamwar
#IWantPeace