दुःखाच्या झाडावरले सुखाचे फुले तोडताच आलें नाहीं
मी नुसता झाडाकडेच पाहत राहिलो
आता दुःखातच हसत असतो, सुखात हसतांना मी कैकदा रडलो
आसवांचे कोंडे कधीच सुटलें नाही ते हसतांना ही आले,
पण् रडतांना मी मात्र कधीच नाही हसलो
दोष माझ्यातील मला शोधताच नाही आला,
मी दुसर्यांनाच दोष देत सुटलो
लिहिली नाही जगन्यांवर कधीच कविता मी,
जगन्याकडुनंच तर जराशी कविता शिकलो
रिक्त मनानें आलो जगात या,
मन भरून मात्र कधीच नाही जगलो
©dhammapal ambhore
#Journey जगन्यातील सुख