आनंदी आनंद गडे .... अनपढ बिनडोक राजा.. हक्काबाबत उदासीन प्रजा अंधभक्त माथेफिरू नवरतने सोबतीला...खऱ्याच खोटं लबाडाच तोंड मोठं.. अनितीचा खुलेआम निर्लजजपानाचा कळस वरतून सालस घरदाज पणा जसा मी नाही त्यातली कडी लाव आतली अशी वार
वारांगना. लोकशाहीचा गळा घोटून शाही लोकांचा नंगा नाच सुरु निवस्त्र काढतात धिंड दरबार षंढ पुन्हा पुन्हा महाभारत तेच रथी महारथी हताश मुकी बिचारी कुणीही हाका बळी तर जाणारच रक्त मासाचा चिखल का कुणास माणूस इतिहासाकडून काहीच कसा धडा घेत नसेल? पुन्हा रक्तरंजित क्रांती इतिहासाची पुनरावृत्ती....आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे..
©निशांत
#nightsky