एक गझल ********** ओंजळीतले पाणी झिरपत गेले वयाप्र | मराठी Video

"एक गझल ********** ओंजळीतले पाणी झिरपत गेले वयाप्रमाणे अक्षर बदलत गेले जमीन ओली होती म्हणून कळले ठसे तुझ्या पायांचे उमटत गेले तुझी वाट मी पाहत बसलो होतो फूल तुझ्या शब्दाचे उमलत गेले तुझा आरसा उन्हात होता ते क्षण कवडसे विचारांचे पकडत गेले पाणवठ्यावर काही पक्षी गेले ऊन जसे झाडावर उतरत गेले काय आणले होते येतानाही हात आपले सगळे हलवत गेले जयदीप"

एक गझल ********** ओंजळीतले पाणी झिरपत गेले वयाप्रमाणे अक्षर बदलत गेले जमीन ओली होती म्हणून कळले ठसे तुझ्या पायांचे उमटत गेले तुझी वाट मी पाहत बसलो होतो फूल तुझ्या शब्दाचे उमलत गेले तुझा आरसा उन्हात होता ते क्षण कवडसे विचारांचे पकडत गेले पाणवठ्यावर काही पक्षी गेले ऊन जसे झाडावर उतरत गेले काय आणले होते येतानाही हात आपले सगळे हलवत गेले जयदीप

मराठी गझल ओंजळीतले पाणी
#marathighazal
#jaydeepjoshimarathighazal

People who shared love close

More like this

Trending Topic