हळुवार झुळूक वाऱ्याची स्पर्शून जाते मना
घुसमटलेल्या श्वासाला मिळतो आसरा
कधी तर वाटतं असावं वाऱ्या सारखं न गुंतता कशात
अडकून राहात नाही मग कुठे
राहावं असच त्याच्या सारखं उंच भराऱ्या घेत आकाशात
असावं एकटच स्वतःच्या संगतीत अगदी आनंदाने जगतं
सोपं होईल मग आयुष्य अपेक्षा विरहित
मग काहीच नाही उरत
©awanti