माझ्यावर कविता कर माझ्यावर कविता कर म्हणणाऱ्या बहिणीचा आज वाढदिवस
आमच्या केसांना घट्ट हात लावून स्वतःच्या केसांना लावत अरे तुझ्या डोक्यातला जास्तीचा तेल मी माझ्या केसांना लावली म्हणत खोबऱ्याचा तेल चोरणारी
लहानपणी भांडण झाल्यावर तुले मी तेवा अर्धा चॉकलेट
देलतो न तो माया चॉकलेट आत वापस कर म्हणणारी
शाळेमध्ये लेफ्ट राईट चालत बॉस नावाने प्रसिद्ध असणारी
माझा वाढदिवस आहे गिफ्ट आंनजो अस एक वर्षापासून गिफ्ट गिफ्ट करणारी
एक अशी पोझ काढ,एक इकडून फोटो काढ,एक तिकडून फोटो काढ, सेल्फी कॅमेरा ने फोटो काढ,काढल्यावर हट गा तुले फोटोच नाई काढता येत
अशी जेव्हा तेव्हा फोटो साठी मर मर करणारी
खाण्यामध्ये एक नंबरची खादाड , तूया घरी हवन आहे न त मले जेवाले बोलवजो, तुया लग्नाले तेल माती पासून जेवाले बोलवजो अशी सगळ्यांचे टिफीन एकटीच घेऊन बसणारी
पाय गोल्या तुया लग्नाले मले कपडे घेऊन देजो नाही त तू पाहून घेजो बापू असे म्हणणारी
बोलण्यात कुणालाही न घाबरणारी एक नंबरची बेडर, बेफिकर, बोलता बोलता पटपट समोरच्याला झापणारी
एक नंबरची उद्धट बोलणारी
मनाने साफ,एक नंबरची कंजूस,शिव्या देण्यात phd झालेली,लहान लहान जोक वर,गावातील झालेले कांड आठवू आठवू खळखळून हसणारी
चुकून तिला काही म्हंटले तर तू भेट मले मग सांगतो तूले असे म्हणणारी दबंग मोनी लां HAPPY WALA BIRTHDAY
©आशिष गंगाधरजी चोले