✍️कवितेचे नाव✍️
न्हवतो कधी मी असा एकला
नव्हतो कधी मी असा इतका शांत उदास अन् एकाकी
संथ माझे जीवन करुनी सांग काय ठेवलेस बाकी..
अजुनही मी पाहतो बरं का
वाट तुझ्या त्या संदेशांची..
पुन्हा येऊनी जगात माझ्या तोड माळ ही बंदिशांची..
कधी येशील तू परतूनी माझ्या हृदयातील ही आर्त जाणण्या..
स्वर हे माझे समजुनी घेऊन
सोबत जीवन गाणे गाण्या..
कळते
मज तू टाळत आहेस..
प्रेम ओळ ही गाळत आहेस..
पण या कवितांच्या पानांना तू चोरून चोरून पाहत आहेस..
एक प्रश्न हा कायम मजला कैसे मज तू समजुनी घेशील..
काव्यपंक्ती या सिद्ध कराया
पुन्हा परतुनी येशील...?
🏮सायंकाळच्या कविता🏮
©व्यंकटेश विनायक कुलकर्णी
8055120315 Gurdeep