अंगाला जाणला हा सोसाट्याचा वारा
मनात भिडला तूझाच सहारा
भारावते क्षण, गंधाळते मन
क्षणात येती या पावसाच्या धारा
का असे होतसे सा॑गना या जीवा
तूझेच असणे भासते या जीवा ||१||
चेहरा आज खूलून आला
मनोमनीच लाजून गेला
आठवणीत ओलाचिंब झाला,
तूझीच आस लावून गेला
का असे होतसे सा॑गना या जीवा
तूझेच असणे भासते या जीवा ||२||
जीवाला कसली हूरहूर
तूझ्यासाठी जीव झालाय आतूर
वेडापिसा जीव हा सारा
क्षणात आज हा तूझाच झाला
काअसे होतसे सा॑गना या जीवा
तूझेच असणे भासते या जीवा ||३||
- प्रिया सपना प्रमोद पवार
#Isolated