विसावा
विसावा शोधीत फिरत होतो वन वन या परी,
माहित नव्हती कुठ भेटेल सुखाची घागरी...
भुलविनाऱ्या वाटा या चालत होतो जरी,
अडथळांच्या लाटा तुडवीत चढत होतो पायरी...
वाऱ्यासारखी धावत होती वेळ ही बावरी,
ढगां आड लपून दाखवत होती काळ ती खरी...
उंच भरारी आकाशी घेऊन शोधत होतो जरी,
थकले सारे मन हे माझे ना ना प्रयत्न करी...
डोळे निपता जाणवत होती मनाची अंधारी,
हुरहुर सारी विचारीत होती लागेल का किनारी...
शोधीताही सापडत नव्हता विसावा हा खरा,
आता मनासही वाटू लागले किलबिल हाच बरा...
चुकले माझे शोधत होतो ना ना या परी,
खरा विसावा मनात होता पांडुरंगाच्या दारी...
विसावा शोधीत फिरत होतो वन वन या परी,
माहीत नव्हती कुठ भेटेल सुखाची घागरी...
©SP
#विसावा
#visava #Serching for inner peace
#marathi #MarathiKavita #poem