White संसारी ती नार
जळतो उरी विस्तव
झेलून रोज वार
पेटून शांत होते
संसारी ती नार
नात्यात श्र्वास भरण्या
ती मोगरा फुलविते
ओवून फूल एक एक
ती अंगणी सजविते
त्या श्र्वासास छेडण्यास
होई मोगरा अतूर
हुंदक्यात रात्र दाटे
का मोगरा मजबूर?
ती पणती होऊन जळते
अन् आस तेवते उरी
या पंखास बळ देण्या
रोज स्वप्नी येई परी
✍️निशा खरात/शिंदे
(काव्यनिश)
©nisha Kharatshinde
संसारी ती नार