तुझ्यासोबत आवडेल मला सूर्यास्त पहायला... त्यावेळी | मराठी Poetry

"तुझ्यासोबत आवडेल मला सूर्यास्त पहायला... त्यावेळी काही लपाछपी नसेल, जे काही भाव असतील खरे असतील, हातात हात देऊन विचारीन तेव्हा तुला, "माझ्यासोबत आयुष्यभर सूर्यास्त पहायला आवडेल का ?" तू कदाचित लाजशील थोडीशी, आणि "हो" म्हणशील माझ्या नजरेला नजर भिडवून, तेव्हा तुझ्या नजरेत एकाच वेळी तो बुडत जाणारा सूर्य आणि नव्याने उदयास येणारा मी... हे पाहण्यासाठी, कायम मनात राहण्यासाठी, येणारं आयुष्य एकमेकांच्या मिठीत वहायला, तुझ्यासोबत आवडेल मला सूर्यास्त पहायला... स्वप्नील हुद्दार . ©Swapnil Huddar"

 तुझ्यासोबत आवडेल मला सूर्यास्त पहायला...
त्यावेळी काही लपाछपी नसेल,
जे काही भाव असतील खरे असतील,
हातात हात देऊन विचारीन तेव्हा तुला,
"माझ्यासोबत आयुष्यभर सूर्यास्त पहायला आवडेल का ?"
तू कदाचित लाजशील थोडीशी,
आणि "हो" म्हणशील माझ्या नजरेला नजर भिडवून,
तेव्हा तुझ्या नजरेत एकाच वेळी तो बुडत जाणारा सूर्य
आणि नव्याने उदयास येणारा मी...
हे पाहण्यासाठी,
कायम मनात राहण्यासाठी,
येणारं आयुष्य एकमेकांच्या मिठीत वहायला,
तुझ्यासोबत आवडेल मला सूर्यास्त पहायला...

स्वप्नील हुद्दार





.

©Swapnil Huddar

तुझ्यासोबत आवडेल मला सूर्यास्त पहायला... त्यावेळी काही लपाछपी नसेल, जे काही भाव असतील खरे असतील, हातात हात देऊन विचारीन तेव्हा तुला, "माझ्यासोबत आयुष्यभर सूर्यास्त पहायला आवडेल का ?" तू कदाचित लाजशील थोडीशी, आणि "हो" म्हणशील माझ्या नजरेला नजर भिडवून, तेव्हा तुझ्या नजरेत एकाच वेळी तो बुडत जाणारा सूर्य आणि नव्याने उदयास येणारा मी... हे पाहण्यासाठी, कायम मनात राहण्यासाठी, येणारं आयुष्य एकमेकांच्या मिठीत वहायला, तुझ्यासोबत आवडेल मला सूर्यास्त पहायला... स्वप्नील हुद्दार . ©Swapnil Huddar

#ಸೂರ್ಯಾಸ್ತ

People who shared love close

More like this

Trending Topic