लग्न करून आलीस
अन् थांबला मोकळा श्वास..
तू नसताना ही मला
सारखे तुझेच होतात भास..
कुठ,का ,कशाला ?
प्रश्नांवर प्रश्न झाले..
उत्तरं देता देता मला
अगदी नाकी नऊ आले..
सुट्टीचां दिवस कधी
सुट्टी सारखा वाटला नाही..
लग्ना आधीच्या सुट्टी सारखा
क्षण पुन्हा अजून भेटला नाही ..
जरी चूक माझी नसली
तरीही मी चुकतो..
चूक तुझी असली जरी
तरीही मी च चुकतो..
मोकळा श्वास नसला तरी
त्या श्र्वासात ही अर्थ आहे ..
तुझ्या शिवाय जगणं जणू
सगळं काही व्यर्थ आहे .
©गोरक्ष अशोक उंबरकर
anniversary