ही पाखरं वेडी भोळी भाबडी भराऱ्या घेतात उंच आस्मान | मराठी Poetry

"ही पाखरं वेडी भोळी भाबडी भराऱ्या घेतात उंच आस्मानी हरवले हक्काचे घर त्यांचे म्हणून भिरभिरतात आता दूषित हवामानी ! माणसांनी उध्वस्त केले रान सारे नि तोडली झाडे हीरवी भराऱ्या घेण्या जागा नसता ऊरली म्हणून आता गच्ची नि शहरा शिरली ! शहरातही शिरुन सुरक्षित जागा नाही न रहायला झाडं न उडायला आकाश जिकडे पाहावं तिकडे गगनचुंबी इमारती मात्र खास ! आता त्यांनी तरी काय करावं या भल्या मोठ्या बुद्धीमान माणसांसमोर म्हणे अख्ख जगंच माझं मग तो असो गाव की असो शहर ! माणसाच्या बुद्धिला तर तोडच नाही पण हा मुर्खपणा पण काही कमी नाही विज्ञान, भुगोल तर शिकतोयच ना मग का शिरत नाही पर्यावरणाची काळजी यांच्या डोक्यातही ? म्हणे प्रगती करतोय, विकास साधतोय ऑक्सिजन विकत घेऊन, श्र्वास घेणार ना तेव्हा कळेल मृत्यूच्या दारात कुणाला ढकलतोय... - Komal parteki ✍️ ©Wings of words"

 ही पाखरं वेडी भोळी भाबडी 
भराऱ्या घेतात उंच आस्मानी 
हरवले हक्काचे घर त्यांचे म्हणून 
भिरभिरतात आता दूषित हवामानी !

माणसांनी उध्वस्त केले रान सारे 
नि तोडली झाडे हीरवी 
भराऱ्या घेण्या जागा नसता ऊरली 
म्हणून आता गच्ची नि शहरा शिरली !

शहरातही शिरुन सुरक्षित जागा नाही
न रहायला झाडं न उडायला आकाश
जिकडे पाहावं तिकडे
गगनचुंबी इमारती मात्र खास !

आता त्यांनी तरी काय करावं
या भल्या मोठ्या बुद्धीमान माणसांसमोर
म्हणे अख्ख जगंच माझं
मग तो असो गाव की असो शहर !

माणसाच्या बुद्धिला तर तोडच नाही
पण हा मुर्खपणा पण काही कमी नाही
विज्ञान, भुगोल तर शिकतोयच ना 
मग का शिरत नाही पर्यावरणाची काळजी यांच्या डोक्यातही ?

म्हणे प्रगती करतोय,
विकास साधतोय
ऑक्सिजन विकत घेऊन, श्र्वास घेणार ना
तेव्हा कळेल मृत्यूच्या दारात कुणाला ढकलतोय...

- Komal parteki ✍️

©Wings of words

ही पाखरं वेडी भोळी भाबडी भराऱ्या घेतात उंच आस्मानी हरवले हक्काचे घर त्यांचे म्हणून भिरभिरतात आता दूषित हवामानी ! माणसांनी उध्वस्त केले रान सारे नि तोडली झाडे हीरवी भराऱ्या घेण्या जागा नसता ऊरली म्हणून आता गच्ची नि शहरा शिरली ! शहरातही शिरुन सुरक्षित जागा नाही न रहायला झाडं न उडायला आकाश जिकडे पाहावं तिकडे गगनचुंबी इमारती मात्र खास ! आता त्यांनी तरी काय करावं या भल्या मोठ्या बुद्धीमान माणसांसमोर म्हणे अख्ख जगंच माझं मग तो असो गाव की असो शहर ! माणसाच्या बुद्धिला तर तोडच नाही पण हा मुर्खपणा पण काही कमी नाही विज्ञान, भुगोल तर शिकतोयच ना मग का शिरत नाही पर्यावरणाची काळजी यांच्या डोक्यातही ? म्हणे प्रगती करतोय, विकास साधतोय ऑक्सिजन विकत घेऊन, श्र्वास घेणार ना तेव्हा कळेल मृत्यूच्या दारात कुणाला ढकलतोय... - Komal parteki ✍️ ©Wings of words

#NatureLove

People who shared love close

More like this

Trending Topic