मुके जाहले शब्द
मुके जाहले शब्द
वेदनेतून उमललेले
गवसले नाही काहीही
तरीही शिंपीत सडा गेले
मौनाची ती पंक्ती
दुसरा गुंता भावनेचा
शल्य गवसले त्रीपंक्तीत
चौथीत काहूर मनाचा
अबोला हा कल्पनेचा
की दडलेला समझोता
शपथबद्ध भासले जणू
दाटला गूढ अर्थ होता
✍️ निशा खरात/शिंदे
(काव्यनिश)
©nisha Kharatshinde
मुके जाहले शब्द