मैत्री....
आयुष्य जगायला शिकवते ती मैत्री
रक्ताचं नातं नसलं तरी
जीव लावते ती मैत्री
काय चूक काय बरोबर
याची जाणीव करून देते ती मैत्री
दुनियादारी शिकवते ती मैत्री
कितीही राग राग केला तरी
शांतपणे ऐकून घेते ती मैत्री
चुकीच्या वळणावर जाण्यापासून थांबवते ती मैत्री
कधी शिव्या देऊन तर कधी ओरडून
समजावून सांगते ती मैत्री
मैत्री वर कितीही लिहलं तरी ते कमीच,
कोणत्याही कोपऱ्यात गेलो तरी
मनात साठवून ठेवता येईल ती मैत्री
आठवणीच्या पसाऱ्यात शोधता येईल ती मैत्री
©Shabda Kimaya
#मैत्री #दोस्ती #yari
#FriendshipDay