White माऊली भेट(अभंग) निघालो वारीला॥ विठ्ठल भेटील | मराठी कविता Video

"White माऊली भेट(अभंग) निघालो वारीला॥ विठ्ठल भेटीला॥ मनी सजविला ॥ भेटीयोग ॥ दर्शनास लागे॥ भक्तांचीच रिघ॥ दिंडीचा परीघ॥ डोळी दिसे॥२॥ आस लागे जिवा॥ पंढरीला जावे॥ तल्लीन मी व्हावे॥ भजनात ॥३॥ कानात भरला॥ टाळांचा गजर॥ हृदयाला पाझर ॥ फुटे कसा॥४॥ होऊनिया दंग॥ वाजवी मृदुंग ॥ ऐकुनी अभंग ॥ मन लागे॥५॥ विटेवरी उभा॥ अठ्ठावीस युगे॥ भक्त सदा जागे॥ विठुसाठी॥६॥ आषाढ कार्तिकी॥ पंढरीची वारी॥ आर्त हाक खरी॥ माऊलीची॥७॥ जय हरी विठ्ठल 🙏🏻 मोहन सोमलकर नागपूर ©Mohan Somalkar "

White माऊली भेट(अभंग) निघालो वारीला॥ विठ्ठल भेटीला॥ मनी सजविला ॥ भेटीयोग ॥ दर्शनास लागे॥ भक्तांचीच रिघ॥ दिंडीचा परीघ॥ डोळी दिसे॥२॥ आस लागे जिवा॥ पंढरीला जावे॥ तल्लीन मी व्हावे॥ भजनात ॥३॥ कानात भरला॥ टाळांचा गजर॥ हृदयाला पाझर ॥ फुटे कसा॥४॥ होऊनिया दंग॥ वाजवी मृदुंग ॥ ऐकुनी अभंग ॥ मन लागे॥५॥ विटेवरी उभा॥ अठ्ठावीस युगे॥ भक्त सदा जागे॥ विठुसाठी॥६॥ आषाढ कार्तिकी॥ पंढरीची वारी॥ आर्त हाक खरी॥ माऊलीची॥७॥ जय हरी विठ्ठल 🙏🏻 मोहन सोमलकर नागपूर ©Mohan Somalkar

#अभंगगाथा

People who shared love close

More like this

Trending Topic