White जिवलग ग्रुप अंतर्गत उपक्रम
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
सावळा विठ्ठल (षडाक्षरी काव्य)
नाव माहेराचे
माझ्या ते इंदोरी
जशी वाटे मज
विठूची पंढरी
तिथेच श्रीक्षेत्र
भंडारा डोंगर
संत तुकाराम
येत नित्यंतर
होते जरी तिथे
घनदाट रान
भय नसे तुका
करीतसे ध्यान
अशी एक दिनी
तुक्याची संगिनी
येत होती वर
भाकरी घेऊनी
काटा तिच्या पायी
रुतला जोरात
बसली विठूला
बोल सुनावत
आला तिथे मग
साक्षात ईश्वर
रूप गुराख्याचं
हातकटेवर
काटा काढताना
नव्हती वेदना
देव तो जिजाला
नव्हती कल्पना
अशा पुण्य भूमी
बालपण गेले
असे वाटे काही
पुण्य कर्म केले
©️®️
सौ. रसिका तुपे
पुणे
©Mohan Somalkar
#sad_shayari