कस्तुरी मृग एक चिमुकले मृग होते l जग बघायला निघा

"कस्तुरी मृग एक चिमुकले मृग होते l जग बघायला निघालेले ll अल्लडपणे भटकत होते l भान त्याचे हरपलेले ll१ll एक अचानक सुगंध आला l चित्त तयाचे मोहून टाकले ll शोध सुगंधाचा करायला l कुरंग रानोरानी फिरू लागले ll२ll जिथे जिथे जाई कृष्णसार l सुगंध अनंत दरवळत राही ll काय करावे किती शोधावे l त्याला काही कळत नाही ll३ll राने झाली वने झाली l झाल्या नद्या नदीकिनारा ll टप्पा टप्पा शोधून काढला l सुगंध शोध मात्र अपुरा ll४ll वेळ गेली काळ गेला l सुगंध शोधात झिजली काया ll तरी उमगेना हरिणाला l सुगंध मात्र तसाच्या तसा ll५ll सर्व जग भटकुन झाले l एकच ठिकाण निरखायचे होते ll स्वतः डोकावून बघितले असते l स्वतः एक कस्तुरीमृग होते ll६ll त्या अद्भुत सुगंधाच्या शोधात l सारंग आयुष्य वीरला ll अफाट या नभात शेवटी l सुगंध तसाच दरवळत राहिला ll७ll ©Geetanjali Karande"

 कस्तुरी मृग

 एक चिमुकले मृग होते l
जग बघायला निघालेले ll
अल्लडपणे भटकत होते l
भान त्याचे हरपलेले ll१ll

एक अचानक सुगंध आला l
चित्त तयाचे मोहून टाकले ll
शोध सुगंधाचा करायला l
कुरंग रानोरानी फिरू लागले ll२ll

जिथे जिथे जाई कृष्णसार l
सुगंध अनंत दरवळत राही ll
काय करावे किती शोधावे l
त्याला काही कळत नाही ll३ll

राने झाली वने झाली l
झाल्या नद्या नदीकिनारा ll
टप्पा टप्पा शोधून काढला l
सुगंध शोध मात्र अपुरा ll४ll

वेळ गेली काळ गेला l 
सुगंध शोधात झिजली काया ll
तरी उमगेना हरिणाला l
सुगंध मात्र तसाच्या तसा ll५ll

सर्व जग भटकुन झाले l
एकच ठिकाण निरखायचे होते ll
स्वतः डोकावून बघितले असते l
स्वतः एक कस्तुरीमृग होते ll६ll

त्या अद्भुत सुगंधाच्या शोधात l
सारंग आयुष्य वीरला ll
अफाट या नभात शेवटी l
सुगंध तसाच दरवळत राहिला ll७ll

©Geetanjali Karande

कस्तुरी मृग एक चिमुकले मृग होते l जग बघायला निघालेले ll अल्लडपणे भटकत होते l भान त्याचे हरपलेले ll१ll एक अचानक सुगंध आला l चित्त तयाचे मोहून टाकले ll शोध सुगंधाचा करायला l कुरंग रानोरानी फिरू लागले ll२ll जिथे जिथे जाई कृष्णसार l सुगंध अनंत दरवळत राही ll काय करावे किती शोधावे l त्याला काही कळत नाही ll३ll राने झाली वने झाली l झाल्या नद्या नदीकिनारा ll टप्पा टप्पा शोधून काढला l सुगंध शोध मात्र अपुरा ll४ll वेळ गेली काळ गेला l सुगंध शोधात झिजली काया ll तरी उमगेना हरिणाला l सुगंध मात्र तसाच्या तसा ll५ll सर्व जग भटकुन झाले l एकच ठिकाण निरखायचे होते ll स्वतः डोकावून बघितले असते l स्वतः एक कस्तुरीमृग होते ll६ll त्या अद्भुत सुगंधाच्या शोधात l सारंग आयुष्य वीरला ll अफाट या नभात शेवटी l सुगंध तसाच दरवळत राहिला ll७ll ©Geetanjali Karande

#कस्तुरी_मृग #मृग #कुरंग #सारंग #कस्तुरीमृग_निल #कस्तुरीचा #कस्तुरी_प्रेम
#मराठीकविता #मराठी

People who shared love close

More like this

Trending Topic