एकटीला एकटीची सोबत झाली जेव्हा.. ...ती मीरा झाली.. | मराठी कविता

"एकटीला एकटीची सोबत झाली जेव्हा.. ...ती मीरा झाली... अन् राधा झाली कृष्ण भेटला तेव्हा... रणरणत्या उन्हात सावलीचं काळीज घेऊन पाऊस झाली रूक्मिणी होऊन... कैक रूपं घेतली असतील तिनं ही तुझ्यावर प्रेम करता करता... तुझी प्रीत झाली प्रेम झालास जेव्हा.. तुझी वेणू झाली...स्वर झालास तेव्हा जेव्हा जेव्हा सावली दाटून आली तिची... तुझं ऊनही भरून आलं बघ तेव्हा... तिचं शोधणं सापडणं गुंतणं हरवणं सारं काही तुझ्याचठायी कारण ती म्हणजे निरपेक्ष श्वास तुझा आणि तू तिची अविरत स्पंदनं... कृष्ण.. ©Tejaa Bhai"

 एकटीला एकटीची सोबत झाली जेव्हा..
...ती मीरा झाली...
अन् राधा झाली 
कृष्ण भेटला तेव्हा...
रणरणत्या उन्हात 
सावलीचं काळीज घेऊन 
पाऊस झाली रूक्मिणी होऊन...
कैक रूपं घेतली असतील तिनं ही तुझ्यावर प्रेम करता करता...
तुझी प्रीत झाली प्रेम झालास जेव्हा..
तुझी वेणू झाली...स्वर झालास तेव्हा
जेव्हा जेव्हा सावली दाटून आली तिची... 
तुझं ऊनही भरून आलं बघ तेव्हा...
तिचं शोधणं
सापडणं
गुंतणं
हरवणं
सारं काही तुझ्याचठायी
कारण ती म्हणजे निरपेक्ष श्वास तुझा 
आणि तू तिची अविरत स्पंदनं...

कृष्ण..

©Tejaa Bhai

एकटीला एकटीची सोबत झाली जेव्हा.. ...ती मीरा झाली... अन् राधा झाली कृष्ण भेटला तेव्हा... रणरणत्या उन्हात सावलीचं काळीज घेऊन पाऊस झाली रूक्मिणी होऊन... कैक रूपं घेतली असतील तिनं ही तुझ्यावर प्रेम करता करता... तुझी प्रीत झाली प्रेम झालास जेव्हा.. तुझी वेणू झाली...स्वर झालास तेव्हा जेव्हा जेव्हा सावली दाटून आली तिची... तुझं ऊनही भरून आलं बघ तेव्हा... तिचं शोधणं सापडणं गुंतणं हरवणं सारं काही तुझ्याचठायी कारण ती म्हणजे निरपेक्ष श्वास तुझा आणि तू तिची अविरत स्पंदनं... कृष्ण.. ©Tejaa Bhai

#janmashtami

People who shared love close

More like this

Trending Topic