दुर देशी गावा॥ बहिण राहते॥
भजन गाविते॥ पंढरीचे॥१॥
भजनात दंग ॥ वाजवी मृदुंग ॥
गाते ती अभंग ॥ विठ्ठलाचे॥२॥
ज्ञानियाची वाणी॥ अभंगात दिसे॥
चंद्रभागा हसे ॥ शब्दातुन ॥३॥
तुकोबांची वाणी॥ नित्यदिनी गाते॥
संसारी रमते॥ आनंदाने॥४॥
पहाटे कवने॥ गाऊनि ती रोज॥
भक्तीमय ताज ॥चढविते॥५॥
ज्ञानेश्वरी पाठ ॥ सांजेला करिते॥
दिप ती लाविते॥ वृदावनी॥६॥
आषाढीची वारी॥ नित्यनियमाने॥
पंढरीला जाणे ॥असे तिचे॥७॥
मोहन सोमलकर
#अभंग
#Geetkaar