प्रत्येक गावच्या एका आजीची गोष्ट...
दुष्काळ, महापूर पाहूनही
चेहऱ्यावरच हसू कधी गेलं नाही..
गावोगावच्यां आजीचं मन
प्रत्येकाला कळलं नाही..
सुरकुतलेल्या चेहऱ्यामागे
दुःख कुणाला दिसलं नाही..
मालक सोडून गेल्यावर
आजीला कोणी उरलं नाही..
पोटच्याणं चपातीला
लाथा शिवाय फेकलं नाही..
दारोदारी भीक मागत
तिला घर पुन्हा दिसलं नाही..
वयानुरूप हरलेल शरीर अन्
अनवाणी चालतात पाय..
भाकर वाढ ग बये
पुण्य लाभेल तुला माय..
भाकर वाढ ग बये
पुण्य लाभेल तुला माय..
©गोरक्ष अशोक उंबरकर
आज्जी