प्रत्येकाने लिहीलयं तिच्यासाठी आज
मी तरी काय लिहावं मग वेगळं ?
तिचं प्रेम,तिची माया,तिचा त्याग..
सगळंच तर सेम असतं !
जगातील प्रत्येक आईचं
तिच्या लेकरांवर सारखंच प्रेम असतं !
तिचे कष्ट,तिची जिद्द,तिचा संघर्ष,
मला काहीतरी ओळख देण्यासाठी..
आपल्यातील 'स्वत्व'ला विसरून,
वर्तमानाला आगीत जाळून, माझ्या
भविष्यासाठी धडपडणारी आईच तर असते !
ती सर्वव्यापी,सर्वज्ञात असते,
भगवंताने पृथ्वीवर माझ्यासाठी पाठवलेला
'स्व-अस्तित्वाचा' अंश आईच तर असते,
'निस्वार्थ, निरपेक्ष' या शब्दांनाही लाज वाटावी,
अशी 'ती' वात्सल्यमुर्ती आईच तर असते,
प्रत्येक भावना 'शब्दात'च व्यक्त व्हाव्या..
आवश्यक तर नाही ना...?
'आई' हा शब्दच विश्वव्यापक अनुभव आहे.
©Samadhan Navale
#MothersDay