सांगू काय वर्णू काय तो आनंद
जेव्हा मनी येते विचार ३ एप्रिल जुमदेव जयंतीचे
भान सारे विसरून जाते
३एप्रिल ला जयंती येता महानत्यागीची
करूया गजर जूमदेव नामाचा
आहे जयंती सोहळा महानत्यागीचा
बाबा हनुमानजी बाबा जूमदेवजी प्रणामाने रॅली होते सुरुवात
टिमकी ते वर्धमान नगर वाजून गाजवून उल्हास सेवकांत
बाबांचा रथ जेव्हा टिमकी मधून निघते
रॅली च्या तालावर पाय साऱ्यांचे थिरकते
करूया गजर जूमदेव नामाचा
आहे जयंती सोहळा महानत्यागीचा
सेवक सारे बाबा हनुमानजी बाबा जुमदेवजी गजरात रंगते
बाबांच्या जय जयकाराने नागपूर नगरी दुमदुमून जाते
जुमदेवजी माझे सदैव हसतमुख
त्यांच्या मार्गी सेवक सारे समसमान
येथे जादूटोणा ,दुःख,सारे भय पळते
तत्व शब्द नियम सेवकांच्या जीवनाचे सार्थक करते
करूया गजर जूमदेव नामाचा
आहे जयंती सोहळा महानत्यागीचा
लेखन:- आशिष गंगाधरजी चोले
मु पो रेवराळ तह मौदा जी नागपूर.
©आशिष गंगाधरजी चोले
जुमदेवजी जयंती