**आयुष्य खूप सुंदर आहे **
मरता केव्हाही येत
पण जगता आल पाहिजे,,,,,,
सुख भोगता केव्हाही येत
पण दुःख पचवता आल पाहिजे
यशानं माणूस उंचजातो
पाय जमिनीवर ठेवता आल पाहिजे
मिळालेल्या यशात समाधान मानून
आनंदी जीवन जगता आल पाहिजे
पाप काय कस ही करता येत
पण पुण्य करता आल पाहिजे
ताठ काय कोणीही राहत
पण जरा झुकून वागता आल पाहिजे
ठेच जीवनात लागतेच
सहन करता आली पाहिजे
मलम पट्टी करून तिला
पुन्हा चालता आल पाहिजे
शहाण्याच सोंग घऊन
वेड होता आल पाहिजे
कशाला बळी न पडता
आनंदी जगता आल पाहिजे
जगण्याच्या लढाईत उणीव कायम भासेल
ती उणीव भरता आली पाहिजे
हास्य आणि आश्रुचा मिलाप करून
समाधानी राहता आल पाहिजे,,,,,,,
भर भरून जगता आल पाहिजे
©रविंद्र Gaikwad