अंधारावर त्याला थोडा जळताना पाहिला,
मी एक चंद्र त्या रात्री उजळताना पाहिला...
घायाळ होऊनही उभे रहावे लागले जगासमोर,
मी एकट्यात त्याला मग विव्हळताना पाहिला...
नभाने किती पार त्याचे सांत्वन केले,
तेव्हा कुठे गाली जरासा निखळताना पाहिला...
जरा त्याला छेडता त्याच्या चांदणीच्या नावे,
शरमेने तेव्हा ढगाआड पळताना पाहिला...
मला म्हंटला किती दुःख करत बसशील गड्या,
एक हसू गाली ठेऊन प्रश्नांना टाळताना पाहिला...
मी एक चंद्र त्या रात्री उजळताना पाहिला...
स्वप्नील हुद्दार
.
©Swapnil Huddar
#Moon