..कित्येक दिवसानंतर..
कित्येक दिवसानंतर मला तीच सायंकाळ आठवत आहे
होय आम्हीच आहोत ! वाऱ्याचा झोत सांगत आहे
तेच मेघ तेच आकाश..
मंदावणारा मात्र तो एकटाच सूर्यप्रकाश..
रविराज मावळताना समुद्र शांत होताना..
तू आठवतेस मला पाखरे निघूनी जाताना..
कुठे असशील तू? कशी असशील तू?
प्रश्न सतत मम् भासत असे...
हं....
इतका भाव असूनही आज ती माझ्या सोबत नसे..
हाच विचार करीत असता पापण्यांच्या कडा ओल्या झाल्या
मग भानावर येऊन मी म्हणालो दाही दिशा बुडूनी गेल्या?
दाही दिशा बुडूनी गेल्या....
🏮सायंकाळच्या कविता🏮
©व्यंकटेश विनायक कुलकर्णी
8055120315