तिच्याशी बोलण्यासाठी परवानगी नाही तर व्यक्त होण्यासाठी स्वातंत्र्य पाहिजे...
जे मी तिला कधी सांगणार नाही ते तिला डोळ्यात वाचता आलं पाहिजे...
मी मांडलेल्या स्वर्गामध्ये तिचाही तितकाच सहवास असला पाहिजे....
मला प्रेमाने दिलेली हाक नको हक्काने दिलेला आवाज पाहिजे....
साधारण व्यक्तिमत्व नको तिच्यात तिच्या खूप साऱ्या तरा पाहिजे....
फिरण्यासाठी कारण नाही तर हवं तेव्हा फिरता आल पाहिजे...
मला विकत घेतलेला नाही तर तिने जबरदस्ती भरवलेला घास पाहिजे....
मला सारखी भांडण नको तर जुळून येईल अशी एखादी रास पाहिजे