चांदण्या राती हात तुझा हाती असता, अबोल दोघेही मात | English Poetry

"चांदण्या राती हात तुझा हाती असता, अबोल दोघेही मात्र श्र्वास प्रवाह वाढत होता, निळ्याभोर आकाशात चंद्र पण आला होता, चांदण्यांचा जणू त्याने शाल पांघरला होता, श्र्वासांचा आपल्या सुगंध चहुकडे पसरला होता, वाराही त्यासवे काहीतरी गुणगुणत होता त्या रातीची निरव शांतता जणु श्र्वासच भंग करित होता, हृदय ही त्याला एकमेव होऊन साथ देत होता, तुझ्या माझ्या भेटीचा चंद्र एकमेव साक्ष होता, चांदण्या राती जेव्हा तुझा हात माझ्या हाती होता... कु. कोमल परतेकी ©Komal Parteki"

 चांदण्या राती 
हात तुझा हाती असता,
अबोल दोघेही मात्र
श्र्वास प्रवाह वाढत होता,

निळ्याभोर आकाशात
चंद्र पण आला होता,
चांदण्यांचा जणू त्याने 
शाल पांघरला होता,

श्र्वासांचा आपल्या सुगंध
चहुकडे पसरला होता,
वाराही त्यासवे 
काहीतरी गुणगुणत होता

त्या रातीची निरव शांतता 
जणु श्र्वासच भंग करित होता,
हृदय ही त्याला
एकमेव होऊन साथ देत होता,

तुझ्या माझ्या भेटीचा 
चंद्र एकमेव साक्ष होता,
चांदण्या राती जेव्हा
तुझा हात माझ्या हाती होता...

कु. कोमल परतेकी

©Komal Parteki

चांदण्या राती हात तुझा हाती असता, अबोल दोघेही मात्र श्र्वास प्रवाह वाढत होता, निळ्याभोर आकाशात चंद्र पण आला होता, चांदण्यांचा जणू त्याने शाल पांघरला होता, श्र्वासांचा आपल्या सुगंध चहुकडे पसरला होता, वाराही त्यासवे काहीतरी गुणगुणत होता त्या रातीची निरव शांतता जणु श्र्वासच भंग करित होता, हृदय ही त्याला एकमेव होऊन साथ देत होता, तुझ्या माझ्या भेटीचा चंद्र एकमेव साक्ष होता, चांदण्या राती जेव्हा तुझा हात माझ्या हाती होता... कु. कोमल परतेकी ©Komal Parteki

People who shared love close

More like this

Trending Topic