White छतावर अंदाधुंद नाचणारा पाऊस झाडांमधून कानाम | मराठी Poetry

"White छतावर अंदाधुंद नाचणारा पाऊस झाडांमधून कानामध्ये कुजबूजणारा पाऊस पक्षांसवे मधुर गीत गाणारा पाऊस पाकळ्यांवर मोत्यासारखा चमकणारा पाऊस इंद्रधनु सप्तरंगी रंगवणारा पाऊस काळोखात दिव्यांसवे लुकलुकणारा पाऊस रात्री ती शांतता पसरविणारा पाऊस आकाशात चंद्रासारखा झळकणारा पाऊस जगाला निश्चिंत निजविणारा पाऊस खिडकीवर थाप मारत उठवणारा पाऊस एकाकी, बेफिकीर राहणारा पाऊस जिवलगांच्या भेटीसाठी तळमळणारा पाऊस इकडे तिकडे... चोहीकडे पाऊस कोणीही न टिपलेला, असाच तो पाऊस ©Anagha Ukaskar"

 White छतावर अंदाधुंद नाचणारा पाऊस 
झाडांमधून कानामध्ये कुजबूजणारा पाऊस 
पक्षांसवे मधुर गीत गाणारा पाऊस 
पाकळ्यांवर मोत्यासारखा चमकणारा पाऊस 
इंद्रधनु सप्तरंगी रंगवणारा पाऊस 
काळोखात दिव्यांसवे लुकलुकणारा पाऊस 
रात्री ती शांतता पसरविणारा पाऊस 
आकाशात चंद्रासारखा झळकणारा पाऊस 
जगाला निश्चिंत निजविणारा पाऊस 
खिडकीवर थाप मारत उठवणारा पाऊस
एकाकी, बेफिकीर राहणारा पाऊस 
जिवलगांच्या भेटीसाठी तळमळणारा पाऊस
इकडे तिकडे... चोहीकडे पाऊस 
कोणीही न टिपलेला, असाच तो पाऊस

©Anagha Ukaskar

White छतावर अंदाधुंद नाचणारा पाऊस झाडांमधून कानामध्ये कुजबूजणारा पाऊस पक्षांसवे मधुर गीत गाणारा पाऊस पाकळ्यांवर मोत्यासारखा चमकणारा पाऊस इंद्रधनु सप्तरंगी रंगवणारा पाऊस काळोखात दिव्यांसवे लुकलुकणारा पाऊस रात्री ती शांतता पसरविणारा पाऊस आकाशात चंद्रासारखा झळकणारा पाऊस जगाला निश्चिंत निजविणारा पाऊस खिडकीवर थाप मारत उठवणारा पाऊस एकाकी, बेफिकीर राहणारा पाऊस जिवलगांच्या भेटीसाठी तळमळणारा पाऊस इकडे तिकडे... चोहीकडे पाऊस कोणीही न टिपलेला, असाच तो पाऊस ©Anagha Ukaskar

#wallpaper #rain #Nature #Nojoto

People who shared love close

More like this

Trending Topic