मव गांव हे नाय | गाव - शिटी | गावाचं गाव पन
त्या चरबीची सर ह्या इस्टीलच्या भांड्यांना यायची नाय माय
तुह्या चुलीवरच्या भाकरीची सर ह्या पोळ्यांना यायची नाय
त्या मडक्यातल्या पाण्याचा थंडावा ह्या फिरिज ला नाय
त्या रांजनातल्या पाण्याची अंगोळ ह्या हीटर च्या पाण्याला नाय गोठ्यातल्या वासरावाणी ह्या कुत्र्यांची माया येत नाय
शेतातल्या बोरांची अन उसाची गोडी या मशनितल्या जुसाला नाय तुह्या चहाची उफळ ह्या थरमास ला नाय गावातल्या राहणं ह्या शिटीमंदी नाय हिरितल पवन अन् नदीचं वाहन या शिवमिंग फुलला नाय माय तुह्या डोई वरच्या पदराईतकी संस्कृती जपन या जीन्स वाल्यांना
व्हायची नाय पयल्या मास्तरांची शिकवणी ह्या सरांना नाय
शाळेचं माहेरपण या परायव्हेट शाळ वाल्यांना ......नाय
पयल्या वाणी माय दोन रूप्यात पूरा बजार व्हायचा नाय
आताच्या महागाई च्या दिवसात पार्ले ची चार बिस्कूट बी येत नाय ते पयल्या वानी माणसात माणुसकी नाय ते पयल्या वाणी माणसांत माणुसकी राह्यली नाय गावाचं गाव पण बी इसरुन जातं हाय गावाचं गाव पण बी हरवून जातं हाय माय.|
©MANAM
#marathi #Poetry #poem #story #Life #MANAM