एक लेक आठवण काढते तुझी रोज
का असा रे बाबा,तू गेलास दूर
आठवण येते रोज
का रे गेला तू दूर
तुलाही रे येते का रे,
माझी आठवण?
आठवणीने तुझ्या साऱ्या
भरून येतात डोळे
पुसण्यासाठी कोणी आता
उरले नाही आपुले
काय केला मी रे गुन्हा,
गेला तू सोडून ,
माफ कर रे आता मला
ये रे परतून
सगळ तुझ ऐकेन..
तू घे मला समजुनी
तुझ्याविना मन हे सूणसूण,
एका लेकीला रे बाबा,आहे तुझी ऊण
तूच आहेस आई अन् तूच रे बाबा
नको पाहू माझा अंत,
ये रे लवकर बाबा....
ये रे लवकर बाबा....
- प्रिया सपना प्रमोद पवार.
#FathersDay
आठवणीतील बाबा