हे जीवाभावाचे॥ दोन बंधुराजे॥
राजेच मनाचे॥ दोघेजण॥
रामलक्ष्मणाची ॥ जोडी ती भावांची॥
कृष्णबलरामाची ॥ शोभेअशी॥
एकामेकाविना ॥ कधीना राही ते ॥
प्रेम जाणवते ॥ दोघांमध्ये॥
ती एकदुसर्याची ॥ प्रेम जिव्हाळ्याची॥
नाती ही रक्ताची ॥ सदा असे॥
एकाला वेदना॥ दुखापत होई ॥
दुसराच पाही॥ अश्रु डोळी॥
धागा हा रक्ताचा ॥ ठेस एका लागे॥
दुसरा तो जागे॥ भाऊ त्याचा॥
कायम टिकावी॥ सदैव राहावी॥
मनात पहावी ॥ नाती हिच॥
आईस भुषण ॥ बाबांना कौतुक ॥
नाते हे नाजुक ॥ प्रेम देई॥
मोहन सोमलकर
#नातं