तु सांग मज मी येईन तेंव्हा.. तिन्हीसांजी तू खिडक | मराठी कविता Video

"तु सांग मज मी येईन तेंव्हा.. तिन्हीसांजी तू खिडकीमधूनी पाहत असता अवकाशासी आठवण माझी येईल जेंव्हा तू सांग मज मी येईन तेंव्हा.. लिहीत असता भाव कविता शब्दच समजा अस्थिर होऊन विस्मरणी मन होईल जेंव्हा तू सांग मज मी येईन तेंव्हा.. कधी दाटता नयनी जल अन् आत्मविश्वास सरला जाऊन खुप एकटे भासेल जेंव्हा.. तू सांग मज मी येईन तेंव्हा... आज आहेस रमुनी जगी या परी मागे पाहता कुणीच नाही.. 'मी'च आहे बघ कायम सोबत जाणीव तुजला होईल जेंव्हा तू सांग मज मी येईन तेंव्हा.. "खूपच आठवण येता माझी गर्द सांज बघ होईल जेंव्हा फिरुनी पुन्हा मग त्याच तीरावर तू सांग मज मी येईन तेंव्हा.." 🏮 सायंकाळच्या कविता 🏮 ©व्यंकटेश विनायक कुलकर्णी "

तु सांग मज मी येईन तेंव्हा.. तिन्हीसांजी तू खिडकीमधूनी पाहत असता अवकाशासी आठवण माझी येईल जेंव्हा तू सांग मज मी येईन तेंव्हा.. लिहीत असता भाव कविता शब्दच समजा अस्थिर होऊन विस्मरणी मन होईल जेंव्हा तू सांग मज मी येईन तेंव्हा.. कधी दाटता नयनी जल अन् आत्मविश्वास सरला जाऊन खुप एकटे भासेल जेंव्हा.. तू सांग मज मी येईन तेंव्हा... आज आहेस रमुनी जगी या परी मागे पाहता कुणीच नाही.. 'मी'च आहे बघ कायम सोबत जाणीव तुजला होईल जेंव्हा तू सांग मज मी येईन तेंव्हा.. "खूपच आठवण येता माझी गर्द सांज बघ होईल जेंव्हा फिरुनी पुन्हा मग त्याच तीरावर तू सांग मज मी येईन तेंव्हा.." 🏮 सायंकाळच्या कविता 🏮 ©व्यंकटेश विनायक कुलकर्णी

#boat

People who shared love close

More like this

Trending Topic