किती चुकावं मीठाने
त्या मिठाने ही लाजावं..
गरज नसताना भाजीत
उगीच जास्त का पडावं ..
करपलेल्या चपाती ने
तव्याला दोषी ठरवावं..
का बरं त्या तव्याने
त्या बिचारीला जाळावं..
अर्ध कच्च्या बटाट्यानी
स्वतःलाच दोषी मानावं..
का त्या शेतकऱ्याने
त्यांना पाणी कमी पाजावं..
चपाती कडक झाल्यावर
त्या गिरणीला आपण बोलावं..
का बरं यार गिरणी ने
अस ठोसर पीठ दळावं..
इतरांच्या चुकांच खापर
बायको वर का फोडावं ..
निष्पाप जीवाला उगीच
आपण नाही कधी छळावं..
©गोरक्ष अशोक उंबरकर
anniversary