जगा अन् जगूद्या सध्या पन्नाशीही पार करणे खूप अवघड | मराठी Poetry

"जगा अन् जगूद्या सध्या पन्नाशीही पार करणे खूप अवघड झालंय अन् आत्महत्या करणे अगदी सोपं झालंय पंचवीस वर्षाच्या नात्याला किंमत राहिली नाही दोन वर्षाच्या प्रेमासाठी कुणी आईचाही उरला नाही त्या रागापुढे सर्वच शून्य अहंकाराने डाव साधला वेदनांनी आवाज न करता भावनांचा गळा घोटला दुनियेचं हसू होईल अन् इज्जतीचा पंचनामा समजून घेऊ जग म्हणतं अन् पडद्याआडून जाहीरनामा इथं कुणी कुणाची निंदा करते स्तुती मात्र क्वचित तिरस्काराने एकमेकांच्या संपली माणुसकीही निश्र्चित अफवांवर पांघरुण घालणारे पडतात फसवणुकीत बळी माहेर आहेर संपलय आता जन्मत:च खुंटते कळी जगा अन् जगूद्या सर्वा या महामारीच्या परिस्थितीत अत्यल्प आयुष्य उरलय बदल करा मनस्थितीत ✍️ निशा खरात/शिंदे (काव्यनिश) ©nisha Kharatshinde"

 जगा अन् जगूद्या

सध्या पन्नाशीही पार करणे
खूप अवघड झालंय
अन् आत्महत्या करणे
अगदी सोपं झालंय

पंचवीस वर्षाच्या नात्याला
किंमत राहिली नाही
दोन वर्षाच्या प्रेमासाठी
कुणी आईचाही उरला नाही

त्या रागापुढे सर्वच शून्य
अहंकाराने डाव साधला
वेदनांनी आवाज न करता
भावनांचा गळा घोटला

दुनियेचं हसू होईल
अन् इज्जतीचा पंचनामा
समजून घेऊ जग म्हणतं
अन् पडद्याआडून जाहीरनामा

इथं कुणी कुणाची निंदा करते
स्तुती मात्र क्वचित
तिरस्काराने एकमेकांच्या
संपली माणुसकीही निश्र्चित

अफवांवर पांघरुण घालणारे
पडतात फसवणुकीत बळी
माहेर आहेर संपलय आता
जन्मत:च खुंटते कळी

जगा अन् जगूद्या सर्वा
या महामारीच्या परिस्थितीत
अत्यल्प आयुष्य उरलय
बदल करा  मनस्थितीत

✍️ निशा खरात/शिंदे
       (काव्यनिश)

©nisha Kharatshinde

जगा अन् जगूद्या सध्या पन्नाशीही पार करणे खूप अवघड झालंय अन् आत्महत्या करणे अगदी सोपं झालंय पंचवीस वर्षाच्या नात्याला किंमत राहिली नाही दोन वर्षाच्या प्रेमासाठी कुणी आईचाही उरला नाही त्या रागापुढे सर्वच शून्य अहंकाराने डाव साधला वेदनांनी आवाज न करता भावनांचा गळा घोटला दुनियेचं हसू होईल अन् इज्जतीचा पंचनामा समजून घेऊ जग म्हणतं अन् पडद्याआडून जाहीरनामा इथं कुणी कुणाची निंदा करते स्तुती मात्र क्वचित तिरस्काराने एकमेकांच्या संपली माणुसकीही निश्र्चित अफवांवर पांघरुण घालणारे पडतात फसवणुकीत बळी माहेर आहेर संपलय आता जन्मत:च खुंटते कळी जगा अन् जगूद्या सर्वा या महामारीच्या परिस्थितीत अत्यल्प आयुष्य उरलय बदल करा मनस्थितीत ✍️ निशा खरात/शिंदे (काव्यनिश) ©nisha Kharatshinde

जगा अन् जगू द्या

People who shared love close

More like this

Trending Topic