मार्गस्थ होती कृष्णमेघ, विशाल नभातूनी,
जणू ठरवून जात आहेत, अपुलीच वाट वेगळी....
अगणित जलबिंदूंचे अस्तित्व तयात सामावूनी,
कुठे ओसंडून जावे, ठरवावे त्यांचेच त्यांनी....
रिते होऊन मग सृष्टीस, हिरवा शालू नेसवावा,
दवबिंदूंच्या मोत्यांचा, हार गुंफुनी द्यावा....
साजिरी अशी वसुंधरा, ओशाळली दवांत
मिलनास आतुर होई, इंद्रधनुच्या रंगात....
व्याकुळ धरेस मग, तुझीच ओढ लागावी,
जलस्पर्शाने मग, मही सुगंधित व्हावी....
अमिता✍️
©Amita
#baarish
#paus