स्वप्नामध्ये दिसतेस तू,
वाऱ्यात मला भासतेस तू
माझ्या मनी असतेस तू
खोल श्वासात वसतेस तू
श्वासात तू भेटना मला
माझ्या जगी ये ना जरा,
नजरेतूनी सांगना मला
माझीच तू आहेस ना?
ओठांवरी नाव हे तुझे
उगाच होती भास का नवे
माझे मला काही न कळले,
जीवाला तुझेच हे वेड लागले
स्वप्नामध्ये दिसतेस तू,
वाऱ्यात मला भासतेस तू
माझ्या मनी असतेस तू
खोल श्वासात वसतेस तू..
- प्रिया सपना प्रमोद पवार
#Butterfly
स्वप्नामध्ये दिसतेस तू...