कृष्ण मनातला... काय उपमा देऊ कृष्णा तुझ्या माझ्य | मराठी कविता Video

"कृष्ण मनातला... काय उपमा देऊ कृष्णा तुझ्या माझ्या नात्याला न झालो सखा अर्जुन न झालो सवंगडी सुदामा ||१|| न रमलो मीरे सारखा, तरीही जपले तुला मनाच्या कोन्यात पाहतो कधी त्या मोरपिसात ऐकतो तुला बासरीच्या सुरात||२|| वसलास मनात माझ्या तुच एक अलौकिक शक्ती बनून हरवलेल्या दिशेचा वाटाड्या कधी काटेरी वाटेवरचा सांगाती||३|| त्या अगाध तुझ्या बाललीला दिसती आजही बालमनांत नाजुक- नाजुक पावलांनी बाल खेळ खेळती घराघरांत||४|| भेट तुझी व्हावी एकदातरी भेटावा मला कृष्ण मनातला हळव्या चंचल मनास माझ्या अर्थ समजावा जीवनातला.||५|| -प्रयाग पवार वाघवाडी परळी सातारा ©prayag pawar "

कृष्ण मनातला... काय उपमा देऊ कृष्णा तुझ्या माझ्या नात्याला न झालो सखा अर्जुन न झालो सवंगडी सुदामा ||१|| न रमलो मीरे सारखा, तरीही जपले तुला मनाच्या कोन्यात पाहतो कधी त्या मोरपिसात ऐकतो तुला बासरीच्या सुरात||२|| वसलास मनात माझ्या तुच एक अलौकिक शक्ती बनून हरवलेल्या दिशेचा वाटाड्या कधी काटेरी वाटेवरचा सांगाती||३|| त्या अगाध तुझ्या बाललीला दिसती आजही बालमनांत नाजुक- नाजुक पावलांनी बाल खेळ खेळती घराघरांत||४|| भेट तुझी व्हावी एकदातरी भेटावा मला कृष्ण मनातला हळव्या चंचल मनास माझ्या अर्थ समजावा जीवनातला.||५|| -प्रयाग पवार वाघवाडी परळी सातारा ©prayag pawar

#कृष्णा

People who shared love close

More like this

Trending Topic