मराठमोळ्या श्रृंगारात खुप
सुंदर दिसतेस तू
अशी हसतांना बघून
थेट हृदयात बसतेस तू
स्मीत हास्य करून
जेव्हा लाजतेस तू
जनू अप्सराच आहेस
अशी भासतेस तू
विचारात माझ्या नेहमीच
फक्त असतेस तू
आता स्वप्नातही माझ्या
फक्त दिसतेस तू
थोडीशी लाजून नजरेला नजर
जेव्हा भिडवतेस तू
या प्रेमवेड्याला प्रेमाची नशा
आणखीणच चढवतेस तू
- धोंडीराम ढोरमारे
©Dhondiram Ramdas Dhormare
#Flower