White दुरावलेली नाती
आधी सारखे नव्हते ते,
नव्हती नजरेला नजर,
नात्याचा धागा तोडूनि,
ओढला होता आपुलकीचा पदर
झरा प्रेमाचा आटला होता,
नात्याची ओढ संपली होती,
वेळ मारून न्यावी तशी,
नात्याची फरपट चालली होती
दगडाला ही पाजर फुटावा,
पण नात्याला प्रेमाचा ओलावा नव्हता,
दुरावला होता प्रत्येक क्षण,
जिथे आपुलकी चा गोडवा नव्हता
बदलत गेलं जग जसं,
तशी नाती बदलत गेली,
आपली म्हणता म्हणता,
जवळची नाती परकी झाली
©Suraj Ambre
#emotional_sad_shayari #relation #viral #SAD #Love