White रोज नवे नवे ते
जगण्याचे बहाणे..
सांग मला पुन्हा
तू भेटशील नव्याने ?
शेवटच्या भेटीला
आसवांनी नहाने..
सोबतच्या क्षणांना
रोज नव्याने पहाणे..
कितीदा आठवावे
क्षण सुखाचे सुहाने..
आता सांग पुन्हा,
तू भेटशील नव्याने..?
©गोरक्ष अशोक उंबरकर
तू भेटशील नव्याने