Happy Holi उधळून जावू दे आज रंग सारे,
भावप्रितिचे गंध बंध नाती सारे ॥
रंगूनिया गेले भाव रेशमाचे,
हरपूनिया गेले ठाव मदनाचे,
वेड लागु दे आज रंगण्याचे,
तनी मनी प्रेम वाढु दे रंगणारे
उधळून जावू दे आज रंग सारे,
भावप्रितिचे गंध बंध नाती सारे ॥
आला नवा नवा रंग असा,
नवचैतन्याचा आनंद तसा,
मी तु रंगलेला बघा कसा,
धरुनी कटी वटी गाली उरे,
उधळून जावू दे आज रंग सारे,
भावप्रितिचे गंध बंध नाती सारे ॥
रंगाचा उत्सव आला होळी,
सण हा दुष्प्रवृतिंना जाळी,
होळी रे होळी पुरणाची पोळी,
मनामनाचे रंग फुलती रे,
उधळून जावू दे आज रंग सारे,
भावप्रितिचे गंध बंध नाती सारे ॥
@ अमोल तपासे
©Amol Tapase
#holi2021