Kumarchitra

Kumarchitra

Storyteller

  • Latest
  • Popular
  • Video

रोज पहाटे मी तुझा चेहरा शोधत असतो गोंधळलेल्या आयुष्यात तुझे प्रेम फक्त जाणवत राहते त्या कळसाच्याच उंचीने! आजच्या कलियुगात तुझी ती कृपा मनाची सगळी जळमट वाहून नेते इंद्रायणीसारखीच! प्रत्येक शांततेच्या क्षणी तुझे शब्द फक्त येतात कानी हे विठ्ठला, तुझ्या सानिध्याने या जगातल्या कोणाचाही आत्मा परिपूर्ण होऊच शकतो! ~ कुमार भोसले जुलै २४, आषाढी ©Kumarchitra

#मराठीकविता #Vithal  रोज पहाटे 
मी तुझा चेहरा शोधत असतो
गोंधळलेल्या आयुष्यात 
तुझे प्रेम फक्त जाणवत राहते
त्या कळसाच्याच उंचीने!

आजच्या कलियुगात
तुझी ती कृपा
मनाची सगळी जळमट वाहून नेते
इंद्रायणीसारखीच!

प्रत्येक शांततेच्या क्षणी 
तुझे शब्द फक्त येतात कानी
हे विठ्ठला, तुझ्या सानिध्याने
या जगातल्या कोणाचाही 
आत्मा परिपूर्ण होऊच शकतो!

~ कुमार भोसले
    जुलै २४, आषाढी

©Kumarchitra

#Vithal

9 Love

#मराठीविचार #temple  © kumarchitra

©Kumarchitra

#temple

66 View

स्वयंचारित्र्यसत्यवचनमर्यादापुरुषोत्तम कुशल प्रशासक रावण संहारक ..प्रभू श्रीरामची एक काव्यगतशिल्पगतचित्रगतभूमिगत बहुविध स्वरूपात प्रकटित राम ..या सम हाच! श्रीरामनवमीच्या शुभेच्छा!! ©Kumarchitra

#मराठीकविता #kumarchitra #ramnavmi  स्वयंचारित्र्यसत्यवचनमर्यादापुरुषोत्तम
कुशल प्रशासक
रावण संहारक 
..प्रभू श्रीरामची एक

काव्यगतशिल्पगतचित्रगतभूमिगत 
बहुविध स्वरूपात 
प्रकटित राम
..या सम हाच!




श्रीरामनवमीच्या शुभेच्छा!!

©Kumarchitra

पाय रोवूनी संकटांवरी खडा तो शिवपुत्र शंभूराजा छावा|| कधी कोणती मोहीम अपयशी ना जाहली अशी पराक्रमकिर्ती उभ्या जगाने पाहिली|| धुरा स्वराज्याची त्यांनी सांभाळली सक्षम जन-मनांत छत्रपतीमुद्रा राहील अक्षय|| अचाट धैर्य अजोड पराक्रम असमान्य शौर्य प्रयत्नांची पराकाष्ठा बहुभाषांवर प्रभुत्व संस्कृत पंडित धर्माभिमानी व्यासंगी आदर्श महावीर श्री छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!! ~ कुमार भोसले ©Kumarchitra

#मराठीविचार #शंभूराजे  पाय रोवूनी संकटांवरी खडा
तो शिवपुत्र शंभूराजा छावा||

कधी कोणती मोहीम अपयशी ना जाहली
अशी पराक्रमकिर्ती उभ्या जगाने पाहिली||

धुरा स्वराज्याची त्यांनी सांभाळली सक्षम
जन-मनांत छत्रपतीमुद्रा राहील अक्षय||

अचाट धैर्य
अजोड पराक्रम
असमान्य शौर्य
प्रयत्नांची पराकाष्ठा
बहुभाषांवर प्रभुत्व
संस्कृत पंडित
धर्माभिमानी
व्यासंगी
आदर्श महावीर
श्री छत्रपती संभाजी महाराज
पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!!










~ कुमार भोसले

©Kumarchitra
#मराठीकविता #अस्तित्व  अस्तित्व टिकवून ठेवण्याचा लढा आपल्यासमोर नाहीये
पण अस्तित्वात असल्याचे दाखले मात्र वेळोवेळी द्यावेच लागतील!

जुन्या वर्षातील चुकांना सावरत आज 
देवू नव-वर्षातील संकल्पांना गुढीची साज

नव-वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!

©Kumarchitra

नववर्ष #अस्तित्व

68 View

ऐलतीर सोडला होता होडीभर स्वप्नं घेऊन नदी होती सोबतीला जशी गावासाठी होते नेहमीच! ..अजून एक नदी होती उभी किनाऱ्याला डोळे भरले पाणी घेऊन सुरू झाला होता प्रवास पैलतीराकडे..!! ©Kumarchitra

#मराठीकविता #river  ऐलतीर सोडला होता 
होडीभर स्वप्नं घेऊन
नदी होती सोबतीला
जशी गावासाठी होते नेहमीच!
 ..अजून एक नदी होती 
उभी किनाऱ्याला 
डोळे भरले पाणी घेऊन
सुरू झाला होता प्रवास 
पैलतीराकडे..!!

©Kumarchitra

ऐलतीर - पैलतीर #river

10 Love

Trending Topic