tags

Best गेले Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best गेले Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about गेले, गेले ते दिवस, गेले द्यायचे राहून.

  • 27 Followers
  • 90 Stories
  • Video
  • Latest
  • Popular
#jaydeepjoshimarathighazal #marathighazal  एक गझल
**********

ओंजळीतले पाणी झिरपत गेले
वयाप्रमाणे अक्षर बदलत गेले

जमीन ओली होती म्हणून कळले
ठसे तुझ्या पायांचे उमटत गेले

तुझी वाट मी पाहत बसलो होतो
फूल तुझ्या शब्दाचे उमलत गेले

तुझा आरसा उन्हात होता ते क्षण
कवडसे विचारांचे पकडत गेले

पाणवठ्यावर काही पक्षी गेले
ऊन जसे झाडावर उतरत गेले

काय आणले होते येतानाही
हात आपले सगळे हलवत गेले

जयदीप

मराठी गझल ओंजळीतले पाणी #marathighazal #jaydeepjoshimarathighazal

659 View