°आली आली दिपावली°
आली आली दिपावली, दारी रंगांची रांगोळी
आगणदिवा आकाशी, दीपतेजांची रोषणाई
पहिली वसुबारस, हळदी कुंकाचे औक्षण
गोधनाची करू पूजा, ओवाळूनी निरांजन
पुढे आली धनतेरस, धन्वंतरी पावो खास
आयुष्यात निरामय, आरोग्याचा लाभो वास
येता नरकचतुर्दशी, होता अभ्यंगाचे स्नान
पापवासनांचा नाश, अहंकाराचे उच्चाटन
मग येई अमावस्या, करू लक्ष्मीचे पूजन
धनधान्या होवो वृध्दी, मनोमनी हे चिंतन
पुढे बली प्रतिपदा, सुरू होते नववर्ष
नव्या आशा नी आकांक्षा, तनमनी होई हर्ष
शेवटी ती भाऊबीज, बहिणीचं अतूट नातं
ओवाळीत बंधुराया, बांधते जन्मीची गाठ
•देवानंद जाधव• धामणी, पुणे.
9892800137
jdevad@gmail.com
©Devanand Jadhav
#Diwali