*🪔🪔।। दिवाळी ।।🪔🪔*
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
मंगल पहाटे आली ही दिवाळी,
अंगणा मधली रंगलेली रांगोळी,
प्राजक्त फुलांचा सुगंध दरवळी,
घनश्याम सुंदरा ऐकतो भुपाळी।
नभात उजळे कंदिल तारा,
तोरण बांधिले घरच्या दारा,
शोभिती सुंदर फुलांच्या माळा,
रोमरोमात शिरला आनंद सारा।
फराळाची रेलचेल चकली रताळी,
अनारसे, लाडु, चिवडा भारी,
उत्सव दिपज्योतीचा लावण्य दारी,
उत्साह प्रेमाचा प्रकाशली दिवाळी।
चेतवू मानवात ज्योत बंधुत्वाची,
भावना रमली एकात्म मानवतेची,
चंदनाची खुण मस्तकी उसळी,
धर्म विश्वाचा ज्ञानदिप उजळी ।
फुलतो नात्यांचा आनंद जिव्हाळी,
दिपावलीचा स्वानंद घेतो भरारी,
सुगीची दिवाळी ठुमकत येत न्यारी,
दुरीतांचे तिमिर हरते माझी दिवाळी।
🪔🪔🪔🪔🪔
*@✍️ अमोल तपासे, सीताबर्डी, नागपूर.
भ्रमणध्वनी ९९६०६७३७८९*
©Amol Tapase
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here