अरे, ती काही बोलायला, ती या जगात असायला तरी पाहिजे ना ? तुझी खूप रे वाट पाहिली तिनं,
अगदी शेवटच्या क्षणापर्यंत, पण तू मात्र आला नाहीस...
तिला काहीतरी झालं होतं...मी फक्त ऐकतच राहिलो,
शब्द तर बाहेर पडायलाच तयार नव्हते,
अश्रू मात्र भळाभळा वाहत होते...
मग आवाज आला, ऐकतोयस ना.. !!!
तू अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस,
आणि दु:खीही होऊ नकोस, असं तिनंच मला सांगितलंय
तुला सांगायला...आणि हो तुझ्यासाठी काहीतरी
लिहून तिनं ठेवलंय, ती म्हणालेली,
माझी आठवण त्याला नक्की येईल,आणि तो इथे फोन करेल, तेव्हा त्याला दे...
#findingyourself