वेड मन
बरेच दिवस विचारायचं होतं ,
कधीतरी तो दिवस येईल ,
याची वाट पाहत होतो ,
तिन्ही त्रिकाल तिचेच विचार ,
स्वत:शीच ठेवून जगत होतो ,
कधी कधी वाटायचं काही बोलायची गरज आहे का ?
विचारल्याविना राहवत नव्हतं ,
विचारायला धीर नव्हता ,
विचारीन विचारीन म्हणत म्हणत फार उशीर तर होत नव्हता ना ?
अखेर एक दिवस ठरवलं ,
खूप वेळ घालवला फोन करून माझ्या मनातला विचार मांडला ,
मला काही अंदाजच नव्हता असं चटकन उत्तर आलं ,
विचार करून सांगीन अशी गरजही दाखवली नाही ,
तेव्हा पासून आजपर्यंत अजूनही विचार करत आहे ,
मनातलं सांगून चूक केली का ?
हीच खंत आतून खात आहे ,
कितीही समजावलं तरी समाधान होत नाही ,
म्हणूनच की काय म्हणतात ना ,
वेड मन काही ऐकत नाही....!!!
#spark