मी माझ्याशी भेटण्याचा योग असाच केव्हा तरी भेटावा
मी एकांती असताना न कळत मला तो जाणवावा
मी माराव्या अनगणित गप्पा माझ्या माझ्याशी
माझ्याच हातांनी हात घेऊन सांत्वन मलाच द्यावा
इतकं सुरेख तर नसतं ना आयुष्य
म्हणूनच जगणं थांबल जात कोठे तरी
शोध असतो अनामिक त्या सहवासाचा
गंध कळतो पण जो कधी उमगत नाही!
©Vishal Pandhare
#alone