राखीपुनव... धागा प्रतीक आहे बांधून आजमावा... राहो | मराठी शायरी आणि गझ

"राखीपुनव... धागा प्रतीक आहे बांधून आजमावा... राहो सुखात भाऊ, करते बहीण धावा! पुनवेस श्रावणाच्या वाटेकडे पहाते... ओवाळणीस बंधू, धावून आज यावा! मोठी असो वयाने की धाकटी असू दे… आईसमान माया, ती लावतेच भावा! आईवडील कोणा जन्मास लाभले ते... लावून जीव ताई, भरते हरेक घावा! काढून वेळ थोडा भेटत चला तिलाही... झुरते जशी मनी ती, तू पण तसा झुरावा! जयराम धोंगडे, नांदेड ©Jairam Dhongade"

 राखीपुनव...

धागा प्रतीक आहे बांधून आजमावा...
राहो सुखात भाऊ, करते बहीण धावा!

पुनवेस श्रावणाच्या वाटेकडे पहाते...
ओवाळणीस बंधू, धावून आज यावा!

मोठी असो वयाने की धाकटी असू दे…
आईसमान माया, ती लावतेच भावा!

आईवडील कोणा जन्मास लाभले ते...
लावून जीव ताई, भरते हरेक घावा!

काढून वेळ थोडा भेटत चला तिलाही...
झुरते जशी मनी ती, तू पण तसा झुरावा!

जयराम धोंगडे, नांदेड

©Jairam Dhongade

राखीपुनव... धागा प्रतीक आहे बांधून आजमावा... राहो सुखात भाऊ, करते बहीण धावा! पुनवेस श्रावणाच्या वाटेकडे पहाते... ओवाळणीस बंधू, धावून आज यावा! मोठी असो वयाने की धाकटी असू दे… आईसमान माया, ती लावतेच भावा! आईवडील कोणा जन्मास लाभले ते... लावून जीव ताई, भरते हरेक घावा! काढून वेळ थोडा भेटत चला तिलाही... झुरते जशी मनी ती, तू पण तसा झुरावा! जयराम धोंगडे, नांदेड ©Jairam Dhongade

#Rakhi

People who shared love close

More like this

Trending Topic